खेड | प्रतिनिधी : खेड शहरासह भरणे परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्याबाबत येथील पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून गेल्या दोन दिवसांत केलेल्या कारवाई नंतर शहरातील गांधी चौक येथे सुरू असलेल्या तीन पत्ती या जुगारावर सोमवारी धाड टाकून चौघांना अटक केली.
नरेश रघुनाथ बर्गे, ज्ञानेश गोविंद गोळे, राजाराम बापु कदम, योगेश रमेश पाटणे अशी त्या गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या चौघाची नावे आहेत हे चारजण बंद रुममध्ये तीन पत्ती पानाचा पत्याचा जुगार खेळ खेळवित असताना मिळून आले. या मध्ये ४७७० रोख व इतर साहित्य असे ५३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.












