रामदास नाटेकर यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी ): मुणगे लब्देवाडी येथील रामदास अंकुश नाटेकर (51 वर्ष ) यांचे अल्प आजाराने निधन झाले. दै प्रहारचे मुणगे येथील ते काही काळ वितरक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. येथील युवा कार्यकर्ते संकेत आणि रोहित नाटेकर यांचे ते वडील होत.