भरणे नाक्यात जुगार अड्ड्यावर धाड, ३ जणांवर गुन्हा

खेड(प्रतिनिधी) भरणे परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्याबाबत येथील पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून मंगळ वारी केलेल्या कारवाई मध्ये २३४० च्या रोकडी सह ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई

भरणे नाका येथील बापू वडापाव सेंटर च्या पाठी मागील बाजूस सुरू असलेल्या तीन पत्ती या जुगारावर धाड टाकली यामध्ये निलेश महेंद्र शिगवण वय ४० वर्षे रा. भडगाव उसरेवाडी ता. खेड , प्रकाश आनंत म्हादे वय- ७५ वर्षे रा. सुकिवली ता. खेड ,आदेश संभाजी गमरे वय- ५० वर्षे रा. डाकबंगला ता. खेड अशी त्या गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत हे तीन जण तीन पत्ती पानाचा पत्याचा जुगार खेळ खेळवित असताना मिळून आले