भांबेड येथे पार पडला कुर्णेकर महाराज समाधी सोहळा
लांजा (प्रतिनिधी) जी व्यक्ती वारकरी संप्रदायाच्या संपर्कात येते, ती आयुष्यात कधीही फुकट जात नाही. असे प्रतिपादन भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी भांबेड येथे केले.
लांजा तालुक्यातील भांबेड येथील वै.ह.भ.प. सोनूबुवा कुर्णेकर पायी दिंडी सेवा संघाच्या वतीने आयोजित कुर्णेकर महाराज यांचा समाधी सोहळा आज बुधवार दिनांक १३ डिसेंबर रोजी भांबेड येथे पार पडला. या समाधी सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माजी खासदार निलेश राणे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते .ते पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदायाच्या सान्रानिध्यात राहणे मला आवडते आणि दरवर्षी म्हणूनच मी न चुकता या समाधी सोहळ्याला उपस्थित राहत असतो. आपला हा कार्यक्रम खरोखर स्तुत्य असून यापुढेही हा कायम असाच चालू ठेवावा असे देखील निलेश राणे म्हणाले. वारकरी संप्रदायाच्या सान्निध्यात राहणे, त्यांचे विचार कानावर पडत राहणे हे नेहमीच आपल्यासाठी भाग्याची गोष्ट ठरते. आज या सोहळ्याच्या निमित्ताने आपण मला बोलावलात आणि माझा सन्मान केलात त्याबद्दल आपला खरोखरच ऋणी असल्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी खासदार निलेश राणे यांचा ह. भ. प. सोनूबुवा कुर्णेकर पायी दिंडी सेवा संघाच्या वतीने हृदय असा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाच्या राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत त्याप्रमाणे लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, जिल्हा सचिव हेमंत शेट्ये ,लांजा नगरपंचायत नगरसेवक संजय यादव तसेच लांजा शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली ,अशोक गुरव, त्याचप्रमाणे पदाधिकारी बावा राणे, महेंद्र शेडे, बाबा लांजेकर, तालुका सरचिटणीस विराज हरमले, नगरसेवक मंगेश लांजेकर यांच्यासह वारकरी संप्रदाय पदाधिकारी व वारकरी उपस्थित होते.







