बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात किंजवडे ठाकूरवाडी प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे नेञदीपक यश

शिरगाव( वार्ताहर) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित केंद्रस्तरीय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवानिमित्त आरे येथे घेण्यात आलेल्या आरे केंद्रस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले.

आरे केंद्रशाळा येथे पार पडलेल्या केंद्रस्तरीय शालेय स्पर्धेत लहान गटात मुलगे ५० मीटर धावणेमध्ये आनंद नायडू द्वितीय क्रमांक, १०० मीटर धावणेमध्ये स्वागत सुर्वे द्वितीय क्रमांक,कबड्डी सांघिक उपविजेता तर मुलीमध्ये ५०मीटर धावणेमध्ये मृणाली सुर्वे द्वितीय क्रमांक,लांब उडी मध्ये शुभ्रा परब द्वितीय क्रमांक, ५०× ४ रिले सांघिक गटात मुली विजेता संघ , समूह नृत्य सांघिक गट विजेता ठरला.या स्पर्धेत शेतकरी गीत “आम्ही जातीचे शेतकरी” या गीतावरील नृत्य खूपच आकर्षित झाले. बाल चमूंनी समूहनृत्य खूपच छान केले. समूहनृत्यांचे परीक्षण केंद्रप्रमुख आनंद राजम, केंद्र मुख्याध्यापक परमेश्वर जाधवर,कोमल राऊत यांनी केले.या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक गोविंदराव जाधव, शिक्षक संजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप परब, उपाध्यक्षा श्रावणी परब,ग्रामपंचायत सदस्या रश्मी परब, साक्षी परब,पूर्वी परब,गणेश चव्हाण व इतर पालकांनी सहकार्य करून पुढील शिरगांव प्रभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या नेञदीपक यशाबदधल विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

या कार्यक्रमाची प्रास्ताविक आनंद राजम, सुञसंचालन विवेक कुलकर्णी, तर आभार भूषणकुमार जगताप यानी मानले.