तु. बा. कदम महाविद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाची सांगता

खेड(प्रतिनिधी)भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयामध्ये कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड-मुंबई च्या ४६ व्या संस्था वर्धापन दिनानिमित्त ११ व १२ डिसेंबर रोजी ‘वार्षिक क्रीडा महोत्सव-२०२३’ ची सांगता करण्यात आली

क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्था सहसचिव . श्री. द. भि. धुमक यांच्या शुभ हस्ते पार पडले. या प्रसंगी प्रमुख अथिती खेड पोलीस निरीक्षक . नितीन भोयर, सचिव अॅड श्री. तु. ल. डफळे , खजिनदार श्री. राजाभाऊ बैकर, संस्था सदस्य बाबाराम तळेकर, संस्था सदस्य श्री. दत्ताशेठ बैकर, प्राचार्य व्ही. एन. साळुंखे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे. व्ही. पाताडे व क्रीडा तज्ञ श्री. अजय निगडेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवात कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ, गोळाफेक, लांब उडी, धावणे, उंच उडी यासारख्या क्रीडाप्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. खो-खो (मुले) या खेळात प्रथम वर्ष वाणिज्य, खो-खो (मुली) द्वितीय वर्ष विज्ञान, कबड्डी या खेळ प्रकारात तृतीय वर्ष कला, हॉलीबॉल या खेळात तृतीय वर्ष कला तर क्रिकेट या क्रीडा प्रकारात द्वितीय वर्ष विज्ञान या संघांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले.

या क्रीडा महोत्सवासाठी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू व क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. जे. व्ही. पाताडे प्रा. व्ही. वाय. चोपडे, प्रा. धनश्री नायर, प्रा. निलेश जाधव, प्रा. संदिप कांबळे, प्रा. सुनील सोनकर, क्रीडा पंच श्री. अजय निगडेकर व अजिंक्य खेडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.