गुहागर | प्रतिनिधी
तालुक्यातील तळवली भडकंबावाडी येथे दरवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह उद्या बुधवार दि.२२ ते रविवार दि.२६ असा पार पाडणार आहे.
यावेळी दररोज सकाळी ४ ते ६ काकडा आरती,सकाळी १० ते १२ ज्ञानेश्वरी पारायण (ह.भ.प. बाळकृष्ण कांबळे)
दररोज सायंकाळी ४ ते ५ प्रवचन,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,रात्रौ ७ ते ९ कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद होईल. यावेळी ह.भ.प. अनंत कळंबाटे, ह.भ.प. प्रज्ञा महेश ताम्हणकर, निगुंडळ, ह.भ.प. महेंद्र दणदणे,ह.भ.प. शैलेश आंब्रे, खेड, ह.भ.प. बाळकृष्ण कांबळे, ह.भ.प. सचिन महाराज साळवी, खरेकोंड तर शनिवार दि. २५.०४.२०२६ रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प. विजय महाराज माळी यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद असणार आहे. तसेच दि.२५ रोजी सायं. ४.०० वा. श्री ची पालखी मिरवणूक सोहळा, रविवार दि. २६.०४.२०२६ रोजी सायं. ४ वा. गोपाळकृष्ण सेवा मंडळ व महिला मंडळ यांची श्री सत्यनारायणाची महापूजा व त्यानंतर रात्रौ ठिक १०.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोपाळकृष्ण सेवा मंडळ आणि महिला मंडळ, भडकंबावाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.












