धामणीत जानेवारीमध्ये क्रिकेट स्पर्धा

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील धामणी येथे २० ते २१ जानेवारी याकालावधीत कै. काशिनाथ गणपत केळसकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

स्पर्धेतील विजेत्यास ७७७७ रूपये, उपविजेत्यास ५५५५ रूपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व मालिकावीर यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागेश जाधव (८७६६४१४०६३) यांच्याशी संपर्क साधावा.