सावंतवाडी । प्रतिनिधी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विविध कामासाठी अर्थसंकल्पात ४० कोटींचा भरघोस निधी प्राप्त झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील रस्त्यांसाठी ११.७० कोटी व पुलांसाठी ९.३५ कोटींचा मंजूर झाला आहे.
तर दोडामार्ग तालुक्यासाठी रस्त्यासाठी ४.३० कोटी तर पुलांसाठी ३.८५ कोटी निधी मंजूर झाला आहे. तसेच वेंगुर्ले तालुक्यातील रस्त्यांसाठी ३.९० कोटी तर पुलासाठी ६.९० कोटी निधी मंजूर झाला आहे अशा प्रकारे मतदारसंघातील रस्त्यांसाठी १९.९० कोटी व पूलासाठी २०.१० कोटी मिळून एकूण ४० कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.











