वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात क्रिडा महोत्सवाला उत्साहात प्रारंभ 

वेंगुर्ले : प्रतिनिधी :वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात आयोजित क्रीडा महोत्सवाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

त्यांनुसार कबड्डी व रस्सीखेच स्पर्धा सुरू झाल्या बॅ. बाळासाहेब खर्डकर साहेबाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून क्रिडा महोत्सवाच्या उदघाटनाला सुरवात झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ले शहरअध्यक्ष श्री उमेश येरम यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले होते. कार्यक्रमास ज्युनि, कॉलेजचे पर्यवेक्षक श्री शितोळे, तसेच श्री. सुरेन्द्र चव्हाण उपस्थित होते. सर्व टीमचे कर्णधार उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यानी क्रीडाज्योत प्रज्वलित करून ट्रॉफिचे अनावरण केले. प्रमुख पाहुणे श्री. उमेश येरम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, खेळातून कशा पद्धतीने संघटन करता येते व निर्णय क्षमता निर्माण होते त्यांचे महत्व सांगितले. तर श्री सचिन वालावलकर यांनी कोकणातील विद्यार्थी कोठेही कमी पडता कामा नये असे म्हणत विद्यार्थ्यांच्या खेळासाठी प्राधान्य देवू असे मत व्यक्त केले तर भाषणामध्ये प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे तसेच मैदानी खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना सागितले.

कबड्डी खेळामध्ये बी.के.सी फायटर यांनी द्वितीय क्रमांक तर बी. के.सी फलटण या संधाने प्रथम क्रमांक मिळवला तसेच मुलांच्या हॉलीबॉल खेळामध्ये बी के सुपर किंग यांनी प्रथम क्रमांक व बी के सी डंग या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.

त्याचबरोबर मुलीच्या बीचबॉल व रस्सीखेच स्पर्धा जल्लोषात पार पडल्या. या क्रिडामहोत्सव उ‌द्घाटनाचे प्रास्ताविक प्रा. व्ही.पी.देसाई तर सुत्रसंचालन प्रा. सी. एस.एस, दिक्षित व आभार प्रदर्शन प्रा. श्री हेमंत गावडे यांनी केले या प्रसंगी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सदर क्रिडामहोत्सवास शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, पेट्रनकौन्सिल मेंबर बोलतराव देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी देसाई यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.