आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील तीन प्रमुख रस्त्यांसाठी सुमारे अडीज कोटी निधी मंजूर 

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय योजनेतून आमदार निलेश राणे यांनी मोठ्या प्रमाणात निधी मतदार संघात मंजूर करून आणला आहे. त्यापैकी सुमारे अडीज कोटी निधीतून मालवण तालुक्यातील तीन प्रमुख रस्ता कामांची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ही कामे प्रस्तावित करण्यात आली असून लवकरच ही कामे पुर्ण होणार आहेत.

 

निविदा प्रक्रिया केलेल्या कामांमध्ये वायरी, तारकर्ली, देवबाग समुद्र चोपाटी पर्यंत रस्ता प्रजिमा २८ रस्ता सुधारणा करणे. रक्कम ८२ लाख ९९ हजार. कावा, वडाचापाट, नांदोस आणि कुसरावे, पेंडूर, नेरूर पर्यंत रस्ता प्रजिमा 34 या रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. रक्कम ८२ लाख ६९ हजार, असरोंडी ते ओसरगांव प्रजिमा 29 रस्ता सुधारणा करणे रक्कम ८१.८० या तीन कामांची निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे.

 

रस्ता कामे मंजूर केल्या बाबत आमदार निलेश राणे यांसह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे तसेच यां कामांबाबत पाठपुरावा करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शिवसेना तालुका प्रमुख विनायक बाईत यांनी आभार मानले आहेत.