कुवेत चे अमिर शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांच्या निधनामुळे आज राष्ट्रीय दुखवटा

रत्नागिरी : कुवेत राज्याचे अमिर शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांचे दिनांक १६ डिसेंबर रोजी निधन झाले असल्याने सह सचिव, भारत सरकार यांच्याकडील बिनतारी संदेशानुसार आज रविवार दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे.*

या कालावधीत ज्या ठिकाणी नियमित राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या ठिकाणी दिनांक

१७ डिसेंबर २०२३ रोज़ी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्यात यावा. या कालावधित कोणत्याही प्रकारचे शासकीय करमणुकीचे कार्यक्रम करण्यात येवू नयेत, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.