सिंधुदुर्गात भाजपा युवा मोर्चाची दमदार वाटचाल; ना.नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नंबर वन’ संघटना – कृष्णराज महाडिक

सिंधुदुर्ग : भाजप युवा मोर्चाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाटचाल सध्या अत्यंत दमदारपणे सुरू असून पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही युवकांची संघटना ‘नंबर वन’ आहे. असा विश्वास भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला.

आज कृष्णराज महाडिक यांनी पालकमंत्री तसेच महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या ‘ओम गणेश’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध विकासकामे, संघटनात्मक वाढ आणि आगामी उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच महाडिक यांनी राणे यांच्याकडून मार्गदर्शनही घेतले.

या भेटीदरम्यान भाजपा युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यसनमुक्ती करण्याबाबत आणि जुगारविरोधात घेतलेली ठाम भूमिका कौतुकास्पद असल्याचे महाडिक यांनी सांगितले. युवा पिढी भरकटू नये यासाठी राणे सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

तसेच, नितेश राणे यांच्या आदरातिथ्यामुळे सिंधुदुर्गात पुन्हा येण्याची इच्छा निर्माण होते, असे मतही कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केले.