देवगड तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद
नारींग्रे येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अभियान विकसित भारत संकल्प यात्रेप्रसंगी नारींग्रे गांव OdF+ मॉडेल झाल्याबद्दल पाणी व स्वच्छता समुह समन्वयक विनायक धुरी यांच्या हस्ते नारींग्रे सरपंच महेश राणे यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले .यावेळी उपसरपंच महेश जंगले , विस्तार अधिकारी आरोग्य अडुळकर मॅडम , तलाठी सुभाष नाडे ,मुख्यसेविका भगत मॅडम , ग्रा.प सदस्य रामदास मिठबांवकर , गट प्रवर्तक उर्मिला सोमन , आरोग्य सेवक संजय कदम , आशा सेविका वैष्णवी परब , आशा सेविका सरीता नारींग्रेकर , आरोग्य सेविका संगिता घागरे , आधार सुविधा केंद्राचे सचिन परब , ग्रामसेवक मनिष टकले , ग्रामसेवक अंकीत धुमाळ , लाभार्थी , ग्रामस्थ व विदयार्थी उपस्थित होते .
या विकसित भारत संकल्प यात्रेला १२ डिसेंबरपासुन सुरवात झाली असुन या संकल्प यात्रेला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे . देवगड तालुक्यातील एकूण ७२ गांवाना भेटी देणार असुन दर दिवशी दोन गावांना सकाळी व दुपारी या कालावधीत या अभियानांतर्गत कार्यक्रम होणार आहेत.
केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम मुद्रा लोन्स, स्टार्टअप इंडिया, पीएम आवास योजना, पीएम भारतीय जन औषधी योजना, उज्वला योजना, आयुष्यमान भारत, स्वच्छ भारत मिशन, जल जिवन मिशन , मनरेगा ,आदी विविध उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली . तसेच शासनाकडील डिजिटल स्क्रीन असलेली सुसज्ज व्हॅन द्वारे केंद्र व राज्य शासनांचे योजना दाखवण्यात आले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरपंच महेश राणे तर आभार उपसरपंच महेश जंगले यांनी मानले .












