विविध कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी: श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट, धामणसें आणि धामणसें ग्रामोत्कर्ष मंडळ,मुंबई यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे कुलस्वामी स्वयंभू श्री रत्नेश्वराचा वार्षिक उत्सव शुक्रवार दिनांक २२/१२/२०२३ ते मंगळवार दिनांक २६/१२/२०२३ पर्यंत साजरा होणार आहे.
यानिमित्ताने सकाळी रुद्राभिषेक आणि रात्रौ आरत्या, भोंवत्या व कीर्तन हे कार्यक्रम होतील. त्याशिवाय पुढील प्रमाणे विशेष कार्यक्रम होतील.शुक्रवार, दि. २२/१२/२०२३ सकाळी ७.३० वा. ध्वजारोहण आणि ग्रामसंकिर्तन, शनिवार दि. २३/१२/२०२३दिवसा विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा, रविवार, दि. २४/१२/२०२३ . दु.२.३० वा. श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टची सर्वसाधारण सभा, सोमवार, दि. २५/१२/२०२३ रोजी सकाळी ७.३० वा. धामणसें ग्रामोत्कर्ष मंडळ, मुंबई तर्फे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, सर्व धामणसें ग्रामस्थांच्या कल्याणाकरिता ‘लघु रुद्र स्वाहाकार (होम हवन आदि),
दुपारी ३ ते ६ या वेळेत विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ., मंगळवार, दि. २६/१२/२०२३ सकाळी -लघु रुद्र अभिषेक,दुपारी येणाऱ्या सर्व भक्तांकरिता धामणसें ग्रामोत्कर्ष मंडळ, मुंबई तर्फे महाप्रसाद, रात्रौ – प्रासादिक नाटयप्रयोग ‘गरुडझेप’ तसेच ‘ग्रामदेवतांचा गोंधळ’ कार्यक्रम शुक्रवार दिनांक २९/१२/२०२३ रोजी दरवर्षी प्रमाणे होईल.
तरी आपण सर्वांनी उत्सवास अगत्य येऊन श्रींचे दर्शनाचा आणि सुश्राव्य कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावर्षी हे 75 वर्षे असून या मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम सुरू असून या आपल्या कार्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे.याकरिता सामाजिक कार्यकर्ते व गावातील तळमळीने काम करणारे अविनाश सखाराम जोशी उपाध्यक्ष असून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.पूर्वजांनी जो वारसा दिला आहे तो आपण चालवला पाहिजे या भावनेने ते कार्यरत आहेत.
ज्यांना आर्थिक मदत कारावयाची आहे त्यांनी श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट जिर्णोद्धार खाते क्रमांक- 142710110000297व IFSC कोड -BKID0001427 बँक ऑफ इंडिया, नेवरे शाखा आहे. अधिक माहिती साठी श्रीकांत वसंत देसाई अध्यक्ष श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट मोबा.9284437624 यांच्याशी संपर्क करावा.











