सोनवडे तर्फ हवेली नं.एक चा दि.24 रोजी शतक महोत्सव सोहळा.

विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

स्वप्निल कदम l कुडाळ :तालुक्यातील सोनवडे तर्फ हवेली येथील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा सोनवडे तर्फ हवेली नंबर एक.प्रशालेचा शतक महोत्सव सोहळा रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे रविवार दिनांक 24 रोजी सकाळी 8.30 वा,ग्रंथ दिंडी सकाळी 9 वा, गणेश पूजन व सरस्वती पूजन सकाळी 11 वा, मुख्य उद्घाटन सोहळा दुपारी 12 वा, आजी- माझी शिक्षक सत्कार सोहळा दुपारी 1.30 ,स्नेहभोजन दुपारी 2.30 वा आजी-माजी विद्यार्थी स्नेह मेळावा, फणी-गेम्स, खेळ पैठणीचा तसेच..रात्री आठ वाजता आजी-माजी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. यानिमित्त मुख्य उद्घाटन सोहळ्या दरम्यान शतक महोत्सवी वाढदिवस साजरा केला जाणार आहे.तसेच संस्थापक अध्यक्ष तैलचित्र अनावरण व श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न होणार आहे.या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रमेश धुरी तसेच विवेकानंद बालम.हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा व तालुकास्तरीय विविध क्षेत्रातील अधिकारी व मान्यवर उपस्थित असणार आहेत.या शतक महोत्सवी कार्यक्रमानिमित्त सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती व शतक महोत्सव संयोजन समिती यांनी केले आहे.