बांद्यात पावणे दोन लाखांची दारू जप्त

इन्सुली एक्साईजची कारवाई

बांदा l प्रवीण परब :  कुडाळ एक्साईज विभागाने इन्सुली एक्साईज कार्यालय समोरच मोठी दारू कारवाई केल्यानंतर इन्सुली विभाग खडबडून जागा झाला आहे. बांदा पिंपळेश्वर मंदिर चौकात आज पहाटे इन्सुली एक्साईजने गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या दारू वाहतुकीवर कारवाई केली. यात १ लाख ७२ हजार ८०० रुपयांच्या दारूसह ६ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शंकर महादेव मंडले (४०, र. कराड, सातारा) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दारू वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कार (एमएच ११ एडबल्यू ०३०२) जप्त करण्यात आली.

सदर कारवाई जिल्हा अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप वस्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक दीपक वायदंडे, जवान रणजीत शिंदे यांच्या पथकाने केली.