नजीकच्या काळात येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोकणातील बेरोजगारीचा मुद्दा मतदानात कळीचा ठरणार .
कोकणात येणारे प्रकल्प व त्यांना होणारा विरोध पाहता, एनजीओंचे राजकारण व सत्तेत असताना स्वतः प्रकल्प आणून त्याच जनतेला सध्याच्या घडीला काय हवे आहे? याचा अभ्यास न करता, मतांच्या राजकारणासाठी विरोधासाठी विरोध करणाऱ्या लोकांना खतपाणी घालून विरोध करायला लावणे. विरोध व समर्थन करणाऱ्या लोकांना नुसत्या प्रशासनाच्या मिटींग करायला न लावता. त्यांच्याबरोबर येथील असणाऱ्या लोकप्रतिनिधी व समर्थक पक्षानी यात विशेष प्रयत्न करून राजकारण विरहित कृती करणे गरजेचे आहे.यामध्येच कोकणाचा विकास दडलेला आहे.
असे मत विल्यें दशक्रोशी समर्थक समिती अध्यक्ष विद्याधर राणे यांनी व्यक्त केले आहे
याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्यावेळी कोकणात अणुऊर्जा प्रकल्प आला तेव्हाही मोठी मोठी आंदोलने झाली. व विरोधही मोठ्या प्रमाणात होता. परंतु त्या वेळचे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नारायणराव राणे यांनी त्यासाठी वेळोवेळी प्रकल्प परिसरात हजारोंच्या सभा घेतल्या. विरोधातील जनतेच्या प्रत्येक समस्येवर उपाय काढून जमिनीच्या मोबदल्यातही घसघशीत अशी वाढ करून दिली. त्यामुळे तेथील जमीनदार जनतेने कोणत्याही विरोधाला न जमता जुमानता जवळजवळ 98 टक्के लोकांनी जमिनीचा मोबदला घेतला. यावेळी तेथील स्थानिक आमदार मा.गणपतराव कदम यांनी जनतेच्या फायद्याचा विचार करून होणाऱ्या विरोधाला न जुमानता योग्य ती भूमिका घेतली. या सर्व बाबींचा अभ्यास करून त्यावेळी नेमका विरोध कोणाचा व कसला होता याचा शोध व आत्मचिंतन विद्यमान सरकारने करणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीत गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी मताच्या राजकारणाचा विचार न करता ग्रीन रिफायनरी प्रकल्प व सी वर्ल्ड प्रकल्प यांचे समर्थन प्रमोद जठार यांनी केले होते. दिनांक 19 /12/ 2023 सिंधुदुर्गात प्रेस घेऊन जठार यांनी बेरोजगारीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला आहे.व त्यामध्ये ‘सरकारने आता कोकणातील बेरोजगारांचा अंत पाहू नये’ असे सरकारला आवाहन केलेले आहे. त्यांच्या या मताशी विलिये दशक्रोशी समर्थन समिती पूर्णपणे सहमत आहे. जठार साहेबांसारख्या उद्योगांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या नेत्याची आता कोकणाला गरज आहे. आणि भविष्यात कोणीही कितीही काहीही म्हटले तरी येथील सुज्ञ जनता यावेळच्या निवडणुकीत सर्व संधीसाधू राजकारण्यांचा वाचपा काढल्याशिवाय राहणार नाही.
असे मतही राणे यांनी व्यक्त केले












