गटई कामगारांच्या कामाच्या जागा कायम कराव्यात

संजय निवळकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

रत्नागिरी : गटई कामगारांच्या कामाच्या जागा कायम कराव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा रत्नागिरी, दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय सुरेश निवळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदान्द्वारे केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या नगर परिषद हद्दीमध्ये अनेक वर्षे गटई कामगार काम करीत आहेत. कामाच्या ठिकाणी जागा कायम नसल्याने अनेक गटई कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्या गटई कामगारांनी जागा निच्छिती साठी अर्ज केले आहेत. त्यांना त्वरित परवानगी पत्र देण्यात यावे समाजामध्ये मागासवर्गीय लोकांचे आरक्षण असून त्यांच्या हक्कांचे स्टॉल हे कुठेही दिसून येत नाही. अनेक ठिकाणी अनधिकृत पानस्टॉल, वडापाव स्टॉल इतर दिसून येत आहेत. त्यांच्याकडे स्टॉल साठी कोणतेही कायदेशीर पक्रिया दिसून येत नाही. अशा स्टॉल वर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.

जिल्ह्यामध्ये अनेक गटई कामगार काम करत असून त्यांनी जागा निच्छिती साठी केलेल्या अर्जाचा विचार विनिमय करून नगरपरिषद, नगरपंचायत मधील मुख्याधिकारी अधिकारी वर्गाला उचित सूचना करून गटई कामगारांच्या जागा कायम करण्याबाबत सूचना करावी गटई कामगारांना कामाकरिता जागा कायम स्वरूपी मिळावी. गटई कामगारांना जागा निच्छिती झाली नाही. तर नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या अनधिकृत स्टॉल बाबत आंदोलन केले जाईल असा इशाराही संजय निवळकर यांनी दिला आहे.