दोघांनी घरात येऊन चोरले सोन्याचे दागिने; वर्षभराने तक्रार दाखल

crime sonyachi chori

रत्नागिरी ः प्रतिनिधी

शहरातील सन्मित्रनगर येथे घरात येउन दोघांनी कपाटातील तब्बल 2 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना 16 मे 2024 पूर्वी घडलेली असून याबाबत एक वर्षानंतर 6 जून 2025 रोजी शहर पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळ क्षिरसागर आणि एक महिला (दोन्ही रा.अमृतसृष्टी सन्मित्रनगर,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात महेश दगडू गुरव (49,रा.बालाजी स्कायचॅलेट जेल रोड,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, या दोन्ही संशयितांनी 16 मे 2024 रोजी किंवा त्यापूर्वी फिर्यादीच्या घरात येउन घरातील कपाटातील 2 लाख 20 हजारांचे 55 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि 45 हजारांची 11 ग्रॅम वजनाची चेन असा एकूण 2 लाख 65 हजारांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 380,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.