तिसऱ्या १९ वर्षातील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये रत्नागिरी संघ विजेता.

लांजा( प्रतिनिधी) नाशिक येथे पार पडलेल्या तिसर्या १९ वर्षातील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाने विजेतेपद पटकावले.

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने ३री १९ वर्षा आतील टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा, सय्यद पिंपरी क्रीडा संकुल नाशिक येथे दिनांक 17 ते 20 डिसेंबर 2023 रोजी उत्साहात संपन्न झाली .

रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी श्री. महालक्ष्मी हायस्कूल खेडशी प्रशाळेच्या क्रीडांगणावरती घेण्यात आली. या निवड चाचणी मध्ये रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि गुहागर या तालुक्यामधून मुलांनी सहभाग घेतला होता. निवड चाचणीतून निवड केलेल्या मुलांमधून रत्नागिरी जिल्ह्याचा संघ तयार करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्हा संघामध्ये हर्ष नाटेकर (कर्णधार), राज कांबळे (उपकर्णधार), आर्यन मस्कर (उत्कृष्ट फलंदाज), स्वराज जक्कार, विघ्नेश निनगावले, सार्थक परपते, दक्ष नाटेकर, सुयोग कलंबटे, शाबीर नाईक, राहुल मांजरेकर, तन्मय सावंत, प्रणय गराटे या मुलांची निवड करण्यात आली होती.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांची मने जिंकली आणि प्रथम क्रमांकाचा मान मिळवला. रत्नागिरी जिल्हा संघाला असोसिएशनचे अध्यक्ष सुमित आनेराव, सचिव सिद्धेश गुरव, रोशन किरडकर, संघ मार्गदर्शक पियुष पवार, मॅनेजर प्रथमेश जाणस्कर, कुणाल हळदणकर यांनी उत्तम मार्गदर्शन केले.

रत्नागिरी जिल्हा संघाने मिळवलेल्या यशाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातून त्यांचा अभिनंदन केले जात आहे. मुचकुंदी परिसर विकास संघ उपाध्यक्ष गणेश खानविलकर, पोलीस पाटील महेश वीर, मधुकर जाधव साहेब, अनिल मस्कर, राहुल धुरी, रोशन कांबळे, अमित वीर, राजू खानविलकर, महादेव खानविलकर, प्रणव खानविलकर, अजय मोर्ये यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

३ री १९ वर्षातील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद भारतीय सचिव आणि महाराष्ट्र सचिव सौ. मीनाक्षी विलास गिरी, महाराष्ट्र वूमन डायरेक्टर कु. धनश्री गिरी, महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे सर, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड सर, पंच कमिटी चेअरमन विजय उंबरे सर, स्कोअर कमिटी चेअरमन संदीप पाटील सर, मुंबई विभाग अध्यक्ष महेश मिश्रा सर, परभणी जिल्हा सचिव शेख सर, सांगली जिल्हा सचिव विजय सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.