आंगणेवाडी यात्रा भाविकांसाठी मोफत चहा नाश्त्याची सोय

लांजा येथील मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचा उपक्रम

सलग पाचव्या वर्षी सामाजिक बांधिलकीचे दर्शन

लांजा हायस्कूल समोर तंबू उभारून सेवा

शेकडो भाविकांनी घेतला लाभ

लांजा (प्रतिनिधी)लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडीन देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजाच्या वतीने सलग पाचव्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर लांजा हायस्कूल येथे मोफत चहा नाश्त्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. जातिभेदाच्या भिंती बाजूला सारुन केवळ सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यात्रेसाठी जाणाऱ्या हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.

हम सबके, सब हमारे हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा या संस्थेने खऱ्या अर्थाने गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिले आहे. कोरोना काळात रुग्णांना मदत करणे असो किंवा चिपळूण, महाड येथील पुरग्रस्तांना मदत या प्रत्येक वेळी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीने जातीभेदाच्या पलीकडे जाऊन आपले सामाजिक योगदान दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडी येथील भराडीन देवीच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे व इतर भागातून चाकरमानी आणि भाविक हे सिंधुदुर्गात दाखल होतात. यात्रेसाठी येणाऱ्या या भाविकांसाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटी ही गेल्या चार वर्षांपासून मोफत चहा नाष्ट्याची सोय करत आहे या वर्षी सलग पाचव्या वर्षी या भाविकांसाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर लांजा हायस्कूल या ठिकाणी तंबू उभारून प्रवाशांना मोफत चहा नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिली होती. दिवस-रात्र या संस्थेने भाविकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने आपल्या सामाजिक एकतेचे दर्शन घडवले आहे. भाविकांनी या ठिकाणी थांबून चहा नाश्ताचा लाभ घेतला आणि सोसायटीच्या सर्व पदाधिकारी सदस्यांना विशेष धन्यवाद दिले.

या संपूर्ण उपक्रमासाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक, उपाध्यक्ष ताज मोहम्मद मुजावर, सचिव राजू नाईक, खजिनदार सईद खान,युवा अध्यक्ष अकिब मुजावर, इब्राहिम वनू,शानू नाईक महिला अध्यक्ष दिलशाद नाईक, आयेशा बागवान शाहीन खान तसेच या उपक्रमावेळी मुस्तफा दसुरकर, गणी दसुरकर,अरमान कादरी, नियात (बंटी) मुजावर, लाला मुजावर, या युवकांनी विशेष मेहनत घेतली. तसेच सदर उपक्रम पार पाडण्यासाठी मुस्लिम वेल्फेअर रत्नागिरीचे अध्यक्ष तथा रत्नागिरी न.प.चे माजी नगरसेवक सोहेल मुकादम आणि वरिष्ठ पत्रकार तसेच संस्थेचे सल्लागार रमजान गोलंदाज आणि प्रसिद्ध उद्योजक समीर घारे साहेब यांचे संस्थेला मार्गदर्शन लाभले.तसेच मुस्लिम वेलफेयर सोसायटी चे संस्थापक व कार्याध्यक्ष अकील नाईक यांच्या विचारातून भराडी देवी भाविकांचे स्वागत हा उपक्रम गेले 5 वर्ष सलग राबिविण्यात येत आहे.
आज ते काही करणात्सव परदेशीं गेले असता त्यांनी उपक्रमाची धुरा तेथून सांभाळून घेतली व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडून घेतला. तसेच या कार्यक्रमासाठी लागणारी विज व शौचालयाची सोय न्यू इंग्लिश स्कूल लांज्याचे चेअरमन जयवंत शेट्ये आणि मुख्याध्यापक सौ. विद्या आठवले यांनी विना मूल्य उपलब्ध करून दिली भाविकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि संस्थेचे भरभरून कौतुक केले.