दिव्यांग व्यक्ती स्वावलंबन योजनेसाठी ४ जानेवारीपर्यंत अर्ज करा

Happy people with disabilities day. Concept happy disabled

 

सिंधुदुर्ग : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनांसाठी ४ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे, आवाहन महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. योजनेचा उद्देश, दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पूनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे. योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.