पालकमंत्री ना.उदय सामंत, विनोद तावडेंची उपस्थिती
रत्नागिरी: रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा.शिर्के प्रशालेला ७५ वर्षे पूर्ण होऊन शाUेचा अमÉत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ संपन्न होत आहे. आज दि. २४ व २५ डिसेंबर २०२३ रोजी प्रशालेच्या रंजन मंदिर समोरील भव्य रंगमंचावर हा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाची जय्यत तयारी शाळेसह विद्यार्थ्यांनी केली आहे. शाळेला सजावट करण्यात आली असून विद्युत रोषणाईने शाळेचा परिसर उजळून निघाला आहे. तर शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्ये उपस्थित राहणार आहेत.
आज दि. २४डिसेंबर २० २३ रोजी सकाळी १०.०० वाजता उद्घाटन समारंभ होणार असून यासाठी राज्याचे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री .ना.श्री उदय सामंत, राज्याचे माजी शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे आणि चितळे उद्योग समूहाचे श्री. संजय चितळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
आज सकाळी ८.३० ते १०या वेळ त नावनोंदणी आणि चहापान, १०ते ११.३० उदघाटन समारंभ, ११.३० ते १ माजी विद्यार्थी व शिक्षक गप्पाटप्पा होणार असून दुपारी १ ते २.३०वेळेत स्नेहभोजन असेल. २.३०ते ४ या वेळेत माजी विद्यार्थ्यांचा गायनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळच्या सत्रात ४ ते ५.३० या वेळेत शिक्षकांचे तर ५.३०ते ७.३० या वेळेत माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतील.
दिनांक २५ डिसेंबर २०२३ चा समारोपीय कार्यक्रम भारत सरकारच्या पर्यटन व बंदरे या खात्याचे केंद्रीय मंत्री तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. श्रीपाद नाईक आणि व राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.श्री. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.सकाळी ९ ते १० चहापान, १००ते ११ माजी शिक्षक सत्कार समारंभ,११ ते १२ शिक्षकांचा आणि १२ ते १.३० माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दुपारी १ ते ३ स्नेहभोजन, ३ ते ४ शिक्षकांचा सांस्कृतिक कार्यक्रम तर ४ ते ६.३० या वेळेत समारोपाचा कार्यक्रम संपन्न होईल. शाळेच्या अमृत महोत्सवाच्या या दोन दिवसीय कार्यक्रमांसाठी प्रशालेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी, हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रशालेतर्फे करण्यात आले आहे.












