असलदे डामरेवाडी उद्या श्री साईबाबा पादुकांची मिरवणूक

२६ डिसेंबरला सत्यनारायणची महापूजा,साईची महाआरती व महाभंडारा

नांदगाव/ प्रतिनिधी

श्री सोमवती देवी सेवा मंडळ असलदे, डामरेवाडी १३ वा वर्धापन दिन व श्री दत्त जयंतीच्या शुभमुहुर्तावर श्री साईबाबा पादुकांची मिरवणूक सोमवार २५ डिसेंबर २०२३ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.तसेच २६ डिसेंबरला सत्यनारायणची महापूजा,साईची महाआरती व महाभंडारा आयोजित करण्यात आला आहे.

२५ डिसेंबरला पालखी मिरवणूक डामरेवाडी-श्री रामेश्वर मंदिर-भालचंद्र महाराज मठ कणकवली-पावाची वाडी (स्नेहभोजन) अशी असणार आहे.तर मंगळवार २६ डिसेंबर २०२३ दत्त जयंती निमित्त सकाळी ९ ते दुपारी १२ वाजता सत्यनारायणची महापूजा ,दुपारी १२ ते २ वाजता साईची महाआरती व महाभंडारा ,दुपारी २ ते ३ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ,दुपारी ३ ते ६ वाजता लहान मुलांसाठी व महिलांसाठी विविध स्पर्धा ,सायं. ७ ते ८ वाजता श्री साई पालखी मिरवणूक (श्री साई मंदिर) ,रात्रौ ९ ते ११ वाजता स्थानिक भजने आणि रात्रौ ११.३० वा. गुरुकृपा दशावतार लोककला नाट्यमंडळ, हळवल, ता. कणकवली यांचेमहापौराणिक दशावतार नाटक – भक्तीचा महिमा होणार आहे.

तरी या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे,असे आवाहन श्री सोमवती देवी सेवा मंडळ, असलदे, डामरेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.