आय.सी.एस.महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांची अभ्यास मंडळावर नियुक्ती

खेड(प्रतिनिधी) येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांची विविध विषयांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉ. अनिता आवटी यांची भूगोल विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड झाली आहे. यापूर्वी २ वेळा त्यांची निवड झाली होती. डॉ.सी.आर. साळुंखे यांची बी.एम.एस. विषयाच्या अभ्यास मंडळावर दुसर्‍यांदा निवड झाली आहे तर डॉ.सचिन भोसले यांची माहिती तंत्रज्ञान विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. हिराभाई बुटाला, कार्याध्यक्ष श्री. मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.