वेंगुर्ले l प्रतिनिधी :मठ ग्रामपंचायत भाजप च्या ताब्यात आल्यापासून खऱ्या अर्थाने विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर झाली. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे माजी आम. राजन तेली यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत विविध विकासकामांना निधी आणला, त्यामुळेच भविष्यात भाजपाच्या माध्यमातून मठ गावात विकासगंगा येईल असे प्रतिपादन युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी भूमिपूजन प्रसंगी केले.
वेंगुर्ला येथील मठ कणकेवाडी ते लोपाद्रेश्वर मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामाचे भूमीपूजन भाजप युवामोर्चा प्रदेशउपाध्यक्ष श्री. प्रथमेश तेली यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच सौ.रुपाली नाईक, उपसरपंच महादेव गावडे, माजी सरपंच धोंडू गावडे, सिद्धी गावडे, शक्तिकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर, युवा नेते अजित नाईक, अक्षय पालव, रोहन गावडे, अरुण गावडे, सुभाष परब, पांडुरंग निवजेकर, मंगेश गावडे, दशरथ गावडे, दिगंबर गावडे, विश्वनाथ निवजेकर व ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.











