चिंदर येथील भगवती माऊली देवीच्या जत्रोत्सवाला उत्साहात सुरुवात

आचरा l अर्जुन बापर्डेकर :चिंदर येथील श्री देवी भगवती माऊली जत्रोत्सवास मंगळवार सकाळ पासूनच उत्साहात सुरूवात झाली.दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविकांनी गर्दी केलीहोती.

सकाळी बारा पाच मानकरी जमल्या नंतर देवीला गा-हाणे घालून साडी चोळी सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आली.त्यानंतर बारा पाच मानक-यांचे नैवेद्य देवीला अर्पण करण्यात आले. यानंतर भाविकांचे नवस फेडणे ओटी भरणेला सुरुवात करण्यात आली होती. सकाळ पासूनच दर्शनाला मंदिरा बाहेर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देवीचे दर्शन सुलभ होण्यासाठीदेवस्थान मानकरी, श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर चे पदाधिकारी केशव घाडी,अरविंद घाडी,दत्ताराम घाडी,धाकू घाडी,सुनील घाडी,अशोक घाडी, नारायण घाडी यांसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष परीश्रम घेत होते.रात्रौ उशिरा ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत रामेश्वर मंदिराकडून ग्रामदेवतांचे तरंगांचे भगवती मंदिराकडे आगमन झाल्यावर जत्रोत्सवाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

*सेल्फी पॉइंट ठरतोय आकर्षण*

 

चिंदर जत्रोत्सवास आलेल्या भाविकांना चिंदर ग्रामपंचायत प्रवेश द्वारावर उभारण्यात आलेला चिंदर सुंदर गाव, आपल चिंदर गाव हे दोन सेल्फी पॉइंट आकर्षण ठरत आहेत.

या जत्रोत्सवात ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात कनगी विक्री साठी येत असल्याने

भगवती माऊलीच्या

जत्रोत्सवाचे ते एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या जत्रोत्सवाला कनग्याची जत्रा म्हणूनही बोलले जात आहे.या जत्रोत्सवाच्या व्यवस्थेसाठी चिंदर ग्रामपंचायत कडूनही सरपंच नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर सर्व सदस्य यात्रोत्सव नियोजनासाठी तत्पर होते. ग्रामपंचायत माध्यमातून विक्रेत्यांना सहकार्य केले गेले होते. या जत्रोत्सवाच्या औचित्यावर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य विभागही तत्पर होता. पाच दिवस चालणारया या जत्रोत्सवाला पहिल्या दिवसापासूनच मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.