आचरा l अर्जुन बापर्डेकर :चिंदरकर यांचे आत्मचरित्र म्हणजे कोकणच्या गेल्या सात दशकांच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक दस्तऐवज आहे.बदलत्या कोकणचा अभ्यास करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असेहे पुस्तक आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात आलेले असामान्य अनुभव चिंदरकर यांनी रेखाटले आहेत. मित्रत्व आणि आप्तियांची नाती कशी जपावी आणि आपली जगाशी नाळ कशी जोडून ठेवावी याची अपूर्व मार्गदर्शन म्हणजे स भा चिंदरकर यांचे आत्मकथन आहे असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी चिंदर भगवती मंदिर येथे व्यक्त केले.
चिंदर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष,
आणि महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी सदाशिव चिंदरकर यांच्या प्रवास मातीतून प्रगतीकडे या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत चिंदर सरपंच नम्रता महंकाळ, देवस्थान समितीचे केशव घाडी,अरुण घाडी,ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष अरुण नाटेकर सेक्रेटरी आत्माराम नाटेकर, जयप्रकाश लब्दे, सुधाकर गुडेकर ,रावजी तावडे, यांनी पोलीस पाटील दिनेश पाताडे ,दिनेश पडवळ , आदी उपस्थित होते.चिंदर यात्रोत्सवाचे औचित्य साधून या वेळी ग्रामोन्नती मंडळ चिंदर मुंबई तर्फे चिंदर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पुस्तका मागिल भावना प्रकट करताना सदाशिव चिंदरकर .आपण कुंभार असल्यानेच मातीशी नातं होतं.या मातीतून प्रगती कडे प्रशासकीय अधिकारी म्हणून झालेली वाटचाल यात प्रकट केली आहे.मी लिहिण्याचे काम केले.प्रेरणा चिंदर ग्रामस्थांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.आभार आत्माराम नाटेकर यांनी मानले.












