मसुरे (प्रतिनिधी ): मालवण तालुक्यातील
पोईप खालची पालववाडी येथील रहिवासी तथा पोईपचे माजी उपसरपंच सोनू बुधाजी उर्फ बाबी पालव (९५) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. जुन्या काळात सोनू पालव यांनी पोईप सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणूनही काम पाहिले होते. उपसरपंच व सोसायटी चेअरमन कार्यकाळातही ग्रामस्थांसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्याकरिता ते नेहमीच प्रयत्नशील होते. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ते परिचीत होते. पोईप येथील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमात ते नेहमीच सक्रीय सहभागी होत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे











