सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते आचरा नागोचीवाडी रस्ता कामाचा शुभारंभ

आचरा l अर्जुन बापर्डेकर :जिल्हा वार्षिक नियोजन मधून मंजूर झालेल्या आचरा नागोचीवाडी   या रस्त्याकामाचा शुभारंभ आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळीउपसरपंच संतोष मिराशी, सदस्य पंकज आचरेकर,जयप्रकाश परुळेकर,अर्जुन बापर्डेकर,अभय भोसले,उदय घाडी,मोहन घाडी,वाघ काका,दिनेश दुखंडे,उत्तम घाडी,भालचंद्र कोळगे,सिद्धार्थ कोळगे,गुरुप्रसाद कांबळी,ठेकेदार सचिन हडकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

आचरा नागोचीवाडी रस्त्याची पुर्णत: दुर्दशा झाली होती. पहिल्या टप्प्यातील रस्ता कामाच्या शुभारंभामुळे काही प्रमाणात या रस्त्यांवरुन प्रवास करणारया ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.