चिपळूण : ट्रकने एस्टी बसला मागून धडक दिल्याची घटना कुंभार्ली घाटात रविवारी घडली. यामध्ये एस्टी बसचे नुकसान झाले असून या अपघात प्रकरणी ट्रक चालकावर अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावीर यल्लपा पुजारी (२६, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद नवनाथ शांताराम गायकवाड यांनी दिली आहे. महावीर पुजारी हा त्याच्या ताब्यातील ट्रक कुंभार्ली घाटातून घेऊन जात असताना तो एका वळणावर आला असता त्याने ट्रक भरधाव वेगात चालवून एस्टी बसला पाठीमागून उजव्या बाजूस जोरदार धडक दिली.
यात एस्टी बसचा मागील बंपर तुटला आहे. तसेच खिडकीची काच फुटून नुकसान झाले आहे. या अपघात प्रकरणी महावीर पुजारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











