दुचाकी सारख्या छोट्या वाहनांचे होतायत अपघात, काँग्रेसचे तालुका सचिव राजन शिंदे यांचे तहसीलदारांना निवेदन
लांजा (प्रतिनिधी) तालुक्याच्या पूर्व भागातील वाटुळ ते दाभोळे या मार्गावर भांबेड ते दाभोळे दरम्यान खडी वाहतूक करणाऱ्या डंपर मधून मोठ्या प्रमाणात खडीची रस्त्यावर पडत असून ही खडी दुचाकी सारख्या वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे.छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यावर सांडलेल्या खडीवरून वाहने घसरून अपघात होत असल्याने याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी लांजा तालुका काँग्रेसचे सचिव राजन शिंदे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की सध्या भांबेड ते दाभोळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक होत आहे. असून सदर डंपर मधून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाणारी खडी ही क्षमतेपेक्षा जास्त
असल्याने अतिरिक्त खडी ही रस्त्यावर सांडते आहे आणि या सांडलेल्या खडीवरून वाहने घसरत आहेत विशेष करून दुचाकी सारख्या वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्यावर सांडणार्या या खडीचे प्रमाण जास्त असल्याने या सुमारे वीस ते पंचवीस ठिकाण अशा प्रकारे या खडीमुळे धोक्याच्या जागा निर्माण झाल्या असून दुचाकी वाहनांचे काही अपघात देखील छोटे मोठे झाले आहेत. त्याचप्रमाणे वाहनांच्या टायरमुळे ही खडी शेतकरी ,गुरे चारणारे आणि पादचारी यांच्या अंगावरून उडून जखमी होण्याची संभावना देखील आहे.
रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यच आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याच्या अगोदर योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तरी या ओव्हरलोड वाहनधारकांना योग्य ती समज द्यावी आणि भविष्यातील होणारे दुर्घटना टाळण्याचे दृष्टीने कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे राजन शिंदे यांनी केले आहे.









