डिव्हायरला धडक बसल्याने ‘धूम’ बाईकस्वारचा अपघात

झाराप पत्रादेवी बायपासवर नेमळे फौजदारवाडी येथील घटना 

सावंतवाडी । प्रतिनिधी : मुबंईवरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी रायडरचा नेमळे फौजदारवाडी येथे दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने अपघात झाला. झाराप पत्रादेवी बायपासवर नेमळे फौजदारवाडी सर्कलवर झालेल्या या अपघातात रायडरच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ब्रेक केल्यामुळे वेगावरील नियंत्रण सुटून गाडी डीवायडरला आदळून हा अपघात घडला. त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्यात आले.

आठवड्यातुन शनिवार रविवार हे रायडर आपल्या मोटर सायकलने १०० च्यावर स्पीडने झाराप पत्रादेवी बायपास वरून मुंबई ते गोवा असा प्रवास करीत असतात. सद्यस्थितीत या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून वाहतुकीसाठी रस्ता धोकादायक बनला आहे. अशा अतिवेगाने गाडी चालविणाऱ्या या रायडरचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याची धडक डिव्हायडरला बसली व अपघात झाला.