खेड | प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गा वरील लोटे चिरणी फाटा नजीक विमल गुटखा वाहतूक करणाऱ्याला जेरबंद करण्यात आले त्याच्या कडून १५ हजार ५२० रुपयांचा विमल गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई ३१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष कृष्णा कासार (वय – ४२ वर्ष रा. मालघर ता.चिपळूण) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे. यातील कासार हा त्यांचे ताब्यातील त्याचा टॅम्पो क्रमांक एम.एच ०८ ए.पी ११४४ या गाडीमधुन तो १५ हजार ५२० किंमतीचा विमल पान मसाला पॅकेट तंबाखु इत्यादी गुटखा प्रतिबंदीत अन्न पदार्थ या अपायकारक तसेच अपत्थकारक नशाकारक पदार्थाची विक्रीसाठी वाहतुक करताना रंगेहाथ मिळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्दे माला मध्ये माल केसर युक्त विमल पान मसाला चॉकलेटी रंगाचे पॅकेट ६६ नग पॅकेट व्ही १ टोबॅको चॉकलेटी रंगाचे पॅकेट ६६ नग पॅकेट , केसर युक्त विमल पान मसाला चॉकलेटी रंगाचा बॉक्स १० नग पॅकेट किंमतीचे केसर युक्त विमल पान मसाला असा मुद्दे माल आढळून आला.