खेड| प्रतिनिधी : खेड तालुक्यातील खोपी तांबडं गाव येथून घराच्या आवारात असलेले ७० हजार रुपये किमतीचे घरगुती साहित्य अज्ञात चोरट्याने लांबवल्या प्रकरणी चोरट्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार १० एप्रिल २०२३ ते ५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान घडला होता त्याचा गुन्हा ३१ डिसेंबर २०२३ रोजी दाखल करण्यात आला आहे
या प्रकरणी सत्यजीत विनायक भोसले (वय ४२, रा. गुंफा रोड, जोगश्वरी पूर्व, मुळ
रा. खोपी ताबडगाव, मधलीवाडी ता. खेड,) जिल्हा रत्नागिरी यांनी तक्रार दाखल केली आहे. यातील फिर्यादी यांचे मालकीच्या बागे मधूनआंबे एच पीचा पाण्याचा पंप सिटेक्सची प्लॅस्टीकची पाण्याची टाकीतसेच बागेचा लोखंडीगेट असा ७० हजार रुपयांचा मुद्दे माल चोरून नेला.