आम आदमी पार्टी सिंधुदुर्गच्या चा उपक्रम
कणकवली – आम आदमी पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने सागर संवाद यात्रे अंतर्गत आचरा खाडी पात्रात कांदळवन रोपांची लागवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्याचे सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
याप्रसंगी कुडाळचे वनक्षेत्रपाल सं. श्री. कुंभार, कडावलचे वनक्षेत्रपाल अमित कटके, मालवण वनपाल श्रीकृष्ण परिठ, आम आदमी पक्षाच्या लीगल सेलचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप वंजारे, आदित्य बटवाले, मिली मिश्रा, राजाराम शेटये, संदेश सावंत, संतोष बागवे, संतोष चिंदरकर, अभि गावडे आदी उपस्थित होते.
आचरा खाडीमध्ये कांदळवन सफारी घडवणारे आणि कांदळ वनांच्या संवर्धनासाठी काम करणारे प्रमोद वाडेकर काका यांचा यावेळी आचरा खाडीमध्ये सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील लाड यांच्या हस्ते शाल पांघरून सत्कार करण्यात आला. प्रमोद वाडेकर यांनी आपल्या परसबागेत कांदळवणाच्या दुर्मिळ प्रजातींची लागवड केली आहे. विविध विद्यापीठातील विद्यार्थी त्यांच्या या परसबागेत येऊन प्रजातींचा अभ्यास करतात. या परसबागेची देखील वनविभागाच्या उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.प्रमोद वाडेकर यांनी यावेळी कांदळ वनांच्या विविध जातींबाबत आणि या वनांमध्ये आश्रय घेणारे पक्षी व विविध प्राणी याबाबतची माहिती दिली. यावेळी शेकडो रोपांची खाडीपत्रात लागवड करण्यात आली.












