खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील कर्जी येथे बंद असलेले घर अज्ञात चोरट्याने फोडून घरातील सुमारे ६६ हजार रुपये किमतीच्या घरगुती वस्तू चोरून नेल्याची घटना ३१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उघड झाली.
या प्रकरणी फैयाज उमर चौगुले यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यांचे राहते घर २२ मे २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधी मध्ये बंद अवस्थेत होते याचा फायदा अज्ञात चोरट्याने उठवून बंद घराचे पाठिमागील खिडकीचा लोखंडी गज हत्याराने कट करून त्याद्वारे घरात अनाधिकृत पणे प्रवेश करुन घराचे पाठिमागील दरवाजाचे आतील लॉक तोडुन घरातील वेगवेगळ्या रुमचे बाहेरील दरवाजाचे कडे कोयडा व लॉक तोंडुन उचकडुन त्याद्वारे घरातील वेगवेगळ्या खोली मध्ये प्रवेश केला व घरातील वेगवेगळ्या खोलीमध्ये ठेवलेले गृहपयोगी वस्तु चोरून नेल्या.
त्या मध्ये १६ हजार रुपये किमतीची तांबा धातुची भांडी त्यामध्ये ४० किलो वजनाच्या दोन, डेगी, जेवनाची २० ताटे, ८. हांडे, ३ कळश्या, पाण्याची छोटी टाकी व इतर भांडी, ४ हजार रुपये किमतीच गॅस शेगडी २ हजार – रुपये किमतीचे दोन स्पीकर असे ६६ रुपये किंमतिचा ऐवज चोरून नेला.












