वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची माहिती
महोत्सवात विविध कार्यक्रम
चिपळूण | प्रतिनिधी : वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्सतर्फे दि. ५ ते ७ जानेवारी रोजी चिपळूणमध्ये वाशिष्ठी कृषी, पशुसंवर्धन प्रदर्शन २०२४ महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी झाली असून या कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचा नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असून या महोत्सवाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांनी दिली
सदरील महोत्सव चिपळूण नागरी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाशेजारील चिपळूण नगर परिषदेच्या सावरकर मैदानात होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कृषि प्रदर्शनात विविध क्षेत्रातील नामांकित उत्पादकांचे, कारखान्यांचे १०० स्टॉल्स सहभागी झाले आहेत. तसेच महिला बचत गटांच्या १०० स्टॉलना प्राधान्य देण्यात आले आहे. एकंदरीत या महोत्सवात २०० स्टॉल्स असणार आहेत.
यासाठी सावरकर मैदानात या पद्धतीने स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. तसेच उद्घाटन, मनोरंजनात्मक कार्यक्रम व मार्गदर्शनपर संवादासाठी भव्य स्टेजदेखील उभारण्यात आले आहे. तर नवीन पिढीला हौसाची माहिती मिळावी, यासाठी महोत्सवात हौसा उभारण्यात आले आहे. या हौसात पशुधन व पेंढा व बैलगाडी देखील असणार आहे. वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एकंदरीत कृषी महोत्सवादरम्यान कोणतेही त्रुटी राहू नये, या दृष्टीने वाशिष्ठी डेअरी प्रकल्प व्यवस्थापनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.
महोत्सवातील कार्यक्रम
कोकणातील सर्वात मोठा कृषी महोत्सव होईल होत असून पहिल्या दिवशी दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल व नंतर सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. या कार्यक्रमात स्टॉल बरोबरच कोकणात शेती व पशूपालनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी काही तज्ज्ञ मार्गदर्शक बोलविले आहेत. या महोत्सवात दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ या वेळेत डॉ. डी. टी. भोसले यांचे प्राण्यांची उत्पादकता, खाद्य, प्रजनन आणि शेती व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन होईल. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी संशोधन केंद्र आवाशीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर जगताप यांचे कोकणातील फायदेशीर भात लागवड भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर सकाळी १०.४५ वाजता, उद्यान विद्या महाविद्यालय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल माळी यांचे सकाळी ११.३० वाजता कोकणातील उद्यानवर्गीय पिकाचे व हळद लागवड या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर दि. ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत कोकणातील पशू व पशूपालन व्यवस्थापन या विषयावर पशूवैद्यकीय चिकित्सा विभाग, चिपळूणचे सहाय्यक आयुक्त डॉ. दत्तात्रय शंकर सोनावले यांचे सकाळी ११ ते १२ या वेळेत गोदरेज ऍग्रोव्हेटचे पशू आहार तज्ञ डॉ. रमेश पताळे पशूआहार व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कल्पेश मधुकर सावंत हे संशोधन अधिकारी आहेत. ते सागरी जीवशास्त्र या विषयातील बंदिस्त खेकडा पालन या नवीन विषयाबाबत मार्गदर्शन करतील.
या बरोबरच शेतीला आवश्यक असलेल्या औजारांचे प्रदर्शन आहे. यात विविध विषयाची माहिती असेल. पशुधन संवर्धन व पाककला स्पर्धा या महोत्सवात होणार आहे. प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांचा बहारदार संगीताचा कार्यक्रम होईल. तसेच गनिमी कावा नृत्य नाटिका होणार आहे.
पशूधनाबाबत माहिती व्हावे यासाठी येथे गाय, रेडा, म्हैस याबरोबर इतर जनावरांचा समावेश आहे. पशूधनासाठी येथे स्पर्धा आहेत. या स्पर्धेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. दीड कोटीचा गजेंद्र रेडा व त्याचे पिल्लू तसेच अज्ञाधारक रेडा ही असणार आहे. या विविध घोडे, पक्षी, ससे, स्पर्धेतील बैल आहेत. डॉग शो आहे. तरी या कृषी महोत्सवातील कोकणातील शेतकऱ्यांना या शेती व पशुपालन विषयी प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी व्यक्त केला आहे. या महत्त्वाच्या यशस्वीतेसाठी वाशिष्टी डेअरी प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मेहनत घेत आहेत.











