जल,जंगल, जमीन हा फंडा आधूनिकरणासाठी भांडवलशाहिनी जगभर वापरला

ज्येष्ठ संपादक आणि लेखक उत्तम कांबळे यांनी अखंड लोकमंच व्याख्यानमालेचे गुंफले दुसरे पुष्प

संतोष राऊळ (कणकवली)
खुल्या अर्थव्यवस्थेत माणसाला या देशातून त्या देशात जाण्यास परवानगी नाही मात्र हजार पटीच्या तुलनेत उत्पादित केलेला माल कोणत्याही देशात तो पोचविला जाऊ शकतो प्रत्येक देशाने तो स्वीकारला पाहिजे ही भांडवलशांचे अर्थव्यवस्था आहे आणि या खुल्या अर्थव्यवस्थेने जगाचे कंबरडे मोडले आहे.जल,जंगल आणि जमीन हा फंडा आधूनिकरणना साठी भांडवलशाहिनी जगभर आणला आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आणि लेखक उत्तम कांबळे यांनी केले अखंड लोकमंच च्या कणकवली – सिंधुदुर्ग आयोजित अखंड व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प “जागतिकीकरण आणि सद्यस्थिती,” या विषयावर लेखक उत्तम कांबळे यांनी यांनी गुंफले यावेळी ते बोलत होते.

अखंड लोक मंच आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाले. यावेळी अखंडचे अध्यक्ष चित्रकार नामानंद मोडक यांनी त्यांचा स्वागत व सत्कार केला. यावेळी बोलताना श्री.उत्तम कांबळे म्हणाले,
माणसाला शिमा बंद असतील मात्र त्याच्या वस्तूंना त्या देशात प्रवेश दिला गेला. ही वस्तू न घेणारी राष्ट्रे होती त्यांना दबाव आणून हे करायला लावले.त्यामुळे जगातल्या अनेक राष्ट्रांनी विरोध केला असला तरी जागतिकीकरणात खुल्या अर्थव्यवस्थेला स्वीकारावेच लागले.१०० कोटिच्या उत्पादन घेतले गेले आणि आज तो तो उत्पादित माल खपण्यासाठी वेगवेगळे फंडे ही अर्थव्यवस्था वापरत आहे.भांडवल शाही शस्त्र तयार करते मात्र ते युद्ध कधी खेळत नाहीत.

१९८५ मध्ये भारतात जागतिकीकरण आले त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग असताना झाले हे अर्धसत्य आहे.दोन राष्ट्रात युद्ध होतात तेव्हा आयात निर्यात बंद होते.भांडवल शाहिचे अशावेली नुकसान होते.
१९१९ पासून एंजिओ तयार केल्या.त्या एंजिओ ला स्विझर्लंड येथे प्रशिक्षण दिले जाते. कोणत्याही देश त्या देशातील जनतेला जगवण्याचे काम करतो त्या ठिकाणची राजसत्ता ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलत असते मात्र एंजिओ ला ते माणसे जागविण्याचा लोकशाही अधिकारच मान्य नाही त्यांच्या मते माणसे जगविण्याचे काम बंद करावे.लोक स्वतःच स्वतः जगेतील त्याला फुकट काही देवू नका.त्याला जगण्याचीच स्पर्धा करून द्यायची. या स्पर्धेतून भांडवलशाह जगतील ही यांची नीती आहे. फक्त त्या देशांनी आणि तिथल्या सत्तेने सीमा, अंतर्गत रचना ,कायदा सुव्यवस्था, एवढेच काम बघावे इतर गोष्टी बघू नयेत लोकांनी कसे जगावे हे त्यांच्यावरच सोपवावे ती जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये अशी भूमिकाच जगभर भांडवलशाही अर्थव्यवस्था राबवत आहे.मोफत आरोग्य शिबीर आणि महागडी औषधे याचाच एक प्रकार आहे. असे उत्तम कांबळे यांनी सांगितले.
आम्ही अर्थव्यवस्थेचे गुलाम आहोत या संदर्भात बोलताना ते म्हणाले,संडास घरोघरी दिले मात्र पाणी नाही. आज प्राधान्य काय जगण्याला प्राधान्य नाही हगण्याला प्राधान्य आहे.सरकारच्या हातातली साधन सामुग्री,सत्ता भांडवल शाही ने हस्तगत केलीआहे. जग या भांडवलशांच्या अधिपत्याखाली आलेल्या आहे.

शेतकरी १९९० पासून आत्महत्या करतो याची कारणे शोधण्यासाठी एक रुपया खर्च केला जात नाही. मात्र १ लाख मदत केली जाते. बेरोजगार मेला तर त्याचा हिशोब सुद्धा कोण करत नाही.केमिकल खतांचा मारा करून जमिनीचे गर्भाशय नापीक केले.
तर काही ठिकाणी पाण्याचा मारा करून जमीन नसावली.एका महिन्याला १२ हजार रुपयांचे पाणी पिण्याची आज आधुनिकता आहे. मिनरल आणि बिसलरी, कोको कोला आणि टीव्हीवर दाखवणाऱ्या सुंदर स्त्रियांच्या जाहिरातीमधील प्रॉडक्ट हात धुण्यासाठी लावले जाणारे शाम्पू हे सर्व आधुनिक भांडवलशांचे जनतेला लुटण्याचे माध्यम आहे.
हवा कोणी प्रदूषित केली तर भांडवल शाहीने केली. त्यांचे मोठमोठे कारखाने दूर होतात विषारी धुरामुळे हवा प्रदूषण मात्र ज्या महाकाय कंपन्यांनी हे सर्व केले त्यांनीच शुद्ध हवे साठी एसी आणली. मात्र त्यांनीच ही हवा दूषित केली.आता तर ऑक्सिजन पार्लर सुरू झाले आहेत. पावलो पावली सुरू केले आहे. मात्र प्रदूषण कोण करत त्याला बायपास करून या लोकांनी नवीन पर्याय काढले…
२०० वर्षात जे शक्य नाही इतके पिक ते २० वर्षात पिक कडून घेतात. आणि जमीन ना पिक करत आहेत.करलो दुनिया मुठीमे ही जाहिरात आठवल्यावर आज कळत की माणूस मोबाईलच्या जाळ्यात कसा अडकलाय. आयडिया सरजी ही जाहिरात म्हणजेच आज ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेले क्लास ही दहा वर्षांपूर्वीची वस्तुस्थिती प्रत्यक्षात आलेली आहे. सर्व जरी झाले तरी माणसांची स्वप्ने मारणारी शेपनस्त्रे अजुन कोणी जन्मला घतकेली नाहीत.त्यामुळे माणूस ध्येयाने जगेल असा विश्वासही उत्तम कांबळे यांनी व्यक्त केला.