सावंतवाडी । प्रतिनिधी : सोनुर्ली व मळगांव गावांच्या सीमेवर वसलेल्या श्री दोन पूर्वस देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ६ जानेवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी नित्य पूजाअर्चा, दर्शन, केळी ठेवणे, ओटी भरणे, नवस बोलणे व फेडणे तर रात्री ११ वाजता पालखी, मिरवणुक व त्यानंतर उशिरा खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव देवस्थान कमिटी व मानकरी ग्रामस्थांनी केले आहे.












