देवगड : नाडण घाडीवाडी ते कानडेवाडी रस्त्याला संरक्षक भिंत बांधणे या जिल्हा वार्षिक योजना मधून मंजूर झालेल्या कामाची भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले
या कामाचे अंदाजपत्रक दहा लाख रुपये आहे. माजी आमदार अजित गोगटे यांनी श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ केला
आमदार नितेश राणे यांनी नाडण गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशा शब्दात गावकऱ्यांना आश्वासन दिले आहे यावेळी
जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, प्रकाश राणे, संजय बोंबडी, युवा सेलचे तालुकाध्यक्ष उत्तम बिरजे, अरीफ बगदादी, बंड्या नारकर, मकरंद जोशी पडेल गावचे सरपंच भूषण पोकळे व अन्य भाजपा पदाधिकारी अधिकारी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते












