भिमा कोरेगाव येथील जयस्थंभाविषयी अपमानास्पद पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करा

लांजा तालुका बौध्दजन मंडळ मुंबई व ग्रामीण यांची मागणी, तहसीलदारांना निवेदन

लांजा | प्रतिनिधी : भिमा कोरेगाव येथील जयस्थंभा विषय अपमानास्पद पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लांजा तालुका बौध्दजन मंडळ मुंबई व ग्रामीण यांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत आज गुरूवारी ४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता लांजा तहसीलदारां मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की
‘X’ या सोशल मीडिया ॲप वरून ,”हेवी ड्रायव्हर आप्पा” या व्यक्तीने आपल्या ऑकांऊन्ट वरून भिमा कोरेगाव येथील जयस्थंभा बाबत अत्यंत वाईट पोस्ट केली आहे. तरी सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करावी, ही विनंती केली आहे. सदर व्यक्तीने आपल्या प्रोफाईलमध्ये शिवजन्मभूमी जुन्नर, पुणे असा पत्ता दिला आहे.

तसेच कारवाई न झाल्यास होणाऱ्या घटनेला आपण जबाबदार असाल असा इशारा दिला आहे. लांजा एक बातमी अपलोड केली आहे. तसेच सदर व्यक्ती आमच्या बौद्ध बांधवांच्या ताब्यात मिळाला व काही वाईट घटना घडल्यास या घटनेला सर्वस्वी महाराष्ट्र सरकार व गृहखाते जबाबदार असेल.त्यामुळे आपण तातडीने पावले उचलावीत व महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी सदर व्यक्तीवर कडक कारवाई करावी. असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देते वेळी ग्रामीण अध्यक्ष संतोष जाधव, कार्याध्यक्ष, नगरसेवक लहू कांबळे, राष्ट्रीय काँग्रेसचे रत्नागिरी कार्याध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया फ्रंटचे जिल्हाध्यक्ष दाजी पितांबर गडहिरे, दिलीप कांबळे, सुशांत कांबळे, राजेंद्र कांबळे, शशिकांत जाधव, प्रभाकर कांबळे उपस्थित होते.