बंजारा समाजाचा प्रत्येक प्रश्न आमचा असेल,शेवटच्या घटकापर्यंत विकास नेणार
*कष्टाने उभ्या राहिलेल्या बंजारा समाजाला कोणाच्या तुकड्याची भीक नको,
*उबाठा आमदार नाईक याला श्री निलेश राणे यांनी ठणकावले
संतोष राऊळ ( कुडाळ)
बंजारा समाजाचे जे जे प्रश्न असतील ते आजपासून आमचे झालेत.तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जावू देणार नाही. राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उपस्थितीत भाजप
पक्षात प्रवेश केला आणि आता तुम्हाला कोणी धमकी दिली असेल तर ती आम्हाला धमकी दिल्या सारखे आहे .त्यामुळे या समाजाला कोणी धमक्या देवू नका देणार असला तर आशीर्वाद द्या. नाहीतर आम्ही पुनर्जन्मावर कधी थांबणार नाही. काय करायचं तो हिशोब याच जन्मात करू.असा इशारा भाजप नेते आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख निलेश राणे यांनी दिला.एकदा आम्ही शब्द दिला की तो पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाही.तुम्ही आमच्या घरचे झाला आहात भाजप पक्ष तुमच्या सोबत आहे. असे ते म्हणाले बंजारा समाज भव्य पक्ष प्रवेशंत्रवते बोलत होते.
यावेळी भाजप नेते नीलेश राणे यांनी उबाठा आमदार नाईक यांचा खरपूस समाचार घेतला.बंजारा समाजाला तुमच्या तुकड्यांची भिक नको. कष्टाने उभा राहिलेला हा समाज आहे.या समजच्या नादी लागू नका. तो तुमच्या हाताला लागणार नाही. असा इशारा दिला.
बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात घेवून आम्ही चालणार आहोत. त्यामुळे राणेंच्या सोबत फक्त उभे राहायचे. तुम्हाला काही करायची गरज नाही.आम्ही सर्व करू. समोरचे डरपोक लोक आहेत. तुमच्या सोबत भाजप आहे. राणे कुटुंब आहे. तुमचे प्रश्न ते आमचे प्रश्न यापुढे तुम्हाला सोबत घेवून चालणार. शेवटच्या माणसापर्यंत पोचले पाहिजे असे आदेश पंतप्रधान मोदी साहेब,केंद्रीय मंत्री राणे साहेब यांचे आहेत.त्यामुळे मी तुमच्या साठी नेहमीच एक भाऊ म्हणून तुमच्या सोबत आहे.
राणे साहेबांच्या उपस्थित तुमचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे यापुढे कोणताही प्रश्न तुमचा राहणार नाही तो सोडविला जाईल असेही यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले.












