PUNE: पुणे: शिरूर येथे भीमा नदीत दोन मुले बुडाली

Black and white of Drowning victims Hand of drowning man needing help. Failure and rescue concept.

Pune: Two children drowned in Bhima river at Shirur

शिरूर येथील भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली.

पुणे: शिरूर येथील भीमा नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाने बुडालेल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. सायंकाळपर्यंत दोघांचा ठावठिकाणा लागला नव्हता. अंधार पडल्याने शोधमोहीम बंद करण्यात आली.

अनुराग विजय मंडला (वय १६) आणि गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. अनुराग आणि गौरव रविवारी भीमा नदीत पोहण्यासाठी गेले होते. नदीचे बंधारे उघडल्याने पाणी वाहत होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. त्यांच्यासोबत पोहणाऱ्या मुलांनी अनुराग आणि गौरवला बुडताना पाहिले. त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बुडालेल्या दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी जवानांनी मोहीम सुरू केली. अंधार पडल्याने शोधमोहीम बंद करण्यात आली.