दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत ठाकरे गट रामगड बेळणे शाखाप्रमुख रामू सादये यांचा भाजपात प्रवेश

मालवण | प्रतिनिधी : भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी ठाकरे गटाला धक्का दिला आहे. दत्ता सामंत यांच्या वाढदिवस निमित्ताने कुंभारमाठ येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात उबाठा गटाचे रामगड बेळणे शाखाप्रमुख रामू सादये यांनी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.