संगीता पाटील समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

कणकवली : पुणे येथील ग्लोबल स्कॉलर्सस फाउंडेशन तर्फे दिनांक ७ जानेवारी रोजी संगीता चंद्रकांत पाटील यांना समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. संगीता पाटील या सध्या ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत. असे असले तरी आपल्या नोकरीचा कधीही मोठेपणा न दाखवता त्या समाजातील दिव्यांग व्यक्तींच्या समस्या सोडविणे, गरजू महिलांना मदत करणे अशा सामाजिक उपक्रमांत संगीता पाटील यांचा मोलाचा वाटा असतो