उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर केले ट्विट
सिंधुदुर्गच्या बीच चे एक्स वर फोटो केले प्रसारित
संतोष राऊळ (कणकवली) : मालदीव पेक्षाही सुंदर कोकण आणि त्यातील सिंधुदुर्ग आहे. हे सांगणारे ट्विट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर केले आहे.त्यासोबत त्यांनी समुद्र किनारपट्टीचे फोटो सुद्धा पाठवले आहेत.
ते एक्स म्हणतात
“..हे मालदीव नाही..!
महाराष्ट्राला लाभलेले हे आपले सुंदर कोकण..!

जेव्हा तुम्ही भारतीय बेटे,किंवा समुद्र किनारे एक्सप्लोर करता,तेव्हा कोकणाला, सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणे चुकवू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्य पराक्रमाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला.तो पाहून मंत्रमुग्ध व्हाल.याच परिसरात भारतातील पहिले एकात्मिक स्कूबा डायव्हिंग स्कूल आहे.जे एमटीडीसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड एक्वाटिक स्पोर्ट्स (IISDA) (PADI) तारकर्ली येथे आहे. भव्य अरबी समुद्राचे चित्तथरारक दृश्य आणि अनुभव असलेला बीच नक्की पहा आणि आनंद घ्या..!” असे एक्स वर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले आहे.दरम्यान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांना हे ट्विट ट्याग केले आहे.












