वैभववाडी भाजपा किसान मोर्चा अध्यक्षपदी अवधूत नारकर यांची निवड

किसान मोर्चा तालुका कार्यकारिणी गठित

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी भाजपा किसान मोर्चा अध्यक्षपदी अवधूत नारकर तर सचिवपदी प्रकाश पांचाळ यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर वैभववाडी भाजपाच्या वतीने नारकर व पांचाळ यांचे अभिनंदन करण्यात आले. गेले दोन वर्ष किसान मोर्चा तालुका अध्यक्षपदी महेश संसार यांनी काम पाहिले.

महेश संसारे यांची किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी सरचिटणीस पदी निवड झाली आहे. तर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी उदय सावंत, रेखा खाडे व प्रमोद सावंत यांची निवड झाली आहे. वैभववाडी किसान मोर्चा कार्यकारणी देखील गठित करण्यात आली आहे. नुतन अध्यक्ष अवधूत नारकर यांचे वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, महेश संसारे, सरपंच प्रदीप जैतापकर, एस. पी. परब, रामदास पावसकर आदी उपस्थित होते.

किसान मोर्चाच्या माध्यमातून शासनाच्या विविध शेती विषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातील असे श्री नारकर यांनी सांगितले.