रामभक्तांकडून निमंत्रक मंत्राक्षतांचे घरोघरी वाटप

वेंगुर्ला | प्रतिनिधी : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या निमंत्रक मंत्राक्षता पोहचविण्यासाठी वेंगुर्ला येथील बहुसंख्य रामभक्तांनी सक्रीय सहभाग घेतला असून घराघरांमध्ये या निमंत्रक मंत्राक्षता दिल्या जात आहे. अयोध्या येथे सोमवार दि. २२ जानेवारी श्रीरामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्री राम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून त्याच प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षता गावागावांतील रामभक्तांपर्यंत पोहचविल्या जात आहेत.

वेंगुर्ला शहरासह तालुक्यात सर्वच घरांमध्ये या मंत्राक्षता पोहचविला जात आहेत. शहरातील १२ नंबर वॉर्डमध्ये श्रीरामभक्तांनी या मंत्राक्षता घरोघरी पोहचविल्या. श्री राम मंदिरच्या या कार्यात विनय गोगटे, राहूल मोर्डेकर, सोहम भगत, वृंदा मोर्डेकर, विनिता सामंत, पूर्वा सामंत, विकास मोर्ये, शुभांगी कनयाळकर, भैय्या शिरसाट, अक्षया शिरसाट, सर्वेश शिरसाट, वैशाली वैद्य, श्रेया मयेकर, शरद मेस्त्री, राजेश कांबळी, दिगंबर वाडकर, भैय्या गुरव आदी सहभागी झाले होते.